नर्मदा नदीचे खोरे

                                                     नर्मदा नदीचे खोरे

आपल्या महाराष्ट्रातून नर्मदा नदीचा काही भाग वाहतो. हे नेहमी सर्वसामान्य लोकांकडून विसरले जाते. महाराष्ट्राच्या वायव्य कोपज्यात नंदुरबार जिल्हयाची सुमारे 54 कि.मी. सरहद्द नर्मदा नदींच्या प्रवाहामुळे तयार होते. ती अतिशय खोल घळईतून वाहते आणि सातपुडा रांगात असलेल्या अक्राणी टेकडयांमुळे तापी नदीपासून अलग झालेले आहे. भौगोलिकदृष्टया या भागातून नर्मदा नदी पार करणे अवघड आहे.
कोकण नद्या किंवा कोकण खोरे
नदीप्रणालीचे क्षेत्र :-
पूर्वेस सहयाद्री पर्वत पश्चिमेस अरबी समुद्र यामुळे कोकण किनारपी मुळातच अरुंद झालेली आहे. शिवाय सहयाद्रीच्या पश्चिमेकडे तीव्र उतार आहे. या दोन कारणांमुळे कोकणातील नद्या लांबीने खूप लहान असून वेगाने वाहतात अरबी समुद्रास मिळतात. उत्तरेस दमणगंगा नदी दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत 720 कि.मी. लांबीच्या 30 ते 60 कि.मी. रुंदीच्या या कोकण किनारपीमधून या नद्या वाहत जातात. या नद्यांची लांबी 49 ते 155 कि. मी. दरम्यान असून कोकणातून वाहणाज्या या नद्यांमधून वार्ष्ाकि पाण्याचा प्रवाह 42,480 दशलक्ष घनमीटर आहे.
कोकणातील नद्या देशातील नद्या यांमध्ये अनेक बाबतींत फरक
(1) देशावरील नद्या पूर्ववाहिनी आहेत तर कोकणातील नद्या पश्चिमवाहिनी आहेत. (2) या नद्यांचा उगम जरी सहयाद्री पर्वतामध्ये होत असला तरी देशावरुन वाहणाज्या नद्या जास्त लांबीच्या आहेत, तर कोकणातील नद्या अतिशय आखूड आहेत. (3) देशावरील नद्यांचे उतार सर्वसाधारण संथ स्वरुपाचे आहेत. त्यांची खोरी रुंद असून त्यांचा विविध प्रकारे उपयोग होतो, तर याउलट कोकणातील नद्या सरळ कडयासारख्या असणाज्या सहयाद्री पर्वतावरुन अतिशय वेगाने वाहत येतात आणि अरुंद खडकाळ प्रदेशावरुन लगेच समुद्रास मिळतात. त्यांचा फारसा उपयोग होत नाही.
कोकणातील नद्यांचे 'खाडी' हे एक वैशिष्टय :-
सहयाद्रीच्या पश्चिम भागात मोठया प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळयात कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहतात. या नद्या समुद्रास मिळताना वाहून आणलेल्या गाळ मुखाजवळ साचल्याने वाळूचे दांडे निर्माण झालेले आहेत. नद्यांच्या मुखाजवळील सागराचे पाणी नदीमध्ये शिरते पाणी खारट बनते. कोकणातून वाहणाज्या नद्यांच्या मुखाजवळ ख्राडया निर्माण झालेल्या आहेत याचा उल्लेख नद्यांच्या किनाज्यालगतच्या प्रदेशात दलदल असून प्रवाहात भरतीचे पाणी शिरते.
विभागवार नद्या :-
कोकणाच्या लांब परंतु अरुंद किनारपीचे उत्तर कोकण, मध्य कोकण दक्षिण कोकण असे तीन विभाग पाडले जातात.
(1) उत्तर कोकणातून दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसई, उल्हास, मुरबाडी या नद्या वाहतात.
(2) मध्य कोकणातून पाताळगंगा, आंबा, कंुडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री या नद्या वाहतात.
(3) दक्षिण कोकणातून काजवी, मुचकंुदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली तेरेखोल या नद्या वाहतात.
कोकणामधील वरील नद्यापैकी वैतरणाव उल्हास या नद्या जास्त लांबीच्या आहेत. या नद्यांच्या मुखाजवळ त्यांचा प्रवाह किनाज्यास समांतर आहे, याचे मुख्य कारण तेथे असणाज्या डोंगरांच्या काही रांगा होय.
उगमाजवळ मोठया प्रमाणात झीज :-
कोकणातून अतिशय वेगाने वाहणाज्या या नद्यांनी त्यांच्या उगमाच्या क्षेत्रात तेथील प्रदेशाची मोठया प्रमाणात झीज केलेली आहे. आणि हळूहळू जलविभाजक पूर्वेकडे सरकत आहेत. अनेक ठिकाणी नदीचौर्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विशेषत: त्र्यंबक घाटात आणि ताम्हणी भागात नदीचौर्य आढळते. वैतरणा आणि सावित्री नद्यांनी पूर्वेकडे वाहणाज्या काही प्रवाहांचा मार्ग आपल्या पात्रामध्ये वळवून घेतलेला आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीचे स्थान कोकणात आहे. मंुबईचा फार मोठया प्रमाणात विकास झालेला आहे. मंुबई, ठाणे, कल्याण, इत्यादी औद्योगिकदृष्टया प्रगत शहरे कोकणात आहेत. त्या मानाने अलिबाग, रत्नागिरी, चिपळून वेंगुर्ला या शहरांचा कमी विकास झालेला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा