भीमा नदी

भीमा नदी
पश्चिम भारतातील एक नदी तसेच कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. पुणे जिल्हयातील भिमाशंकरच्या डोंगरांमधुन उगम होऊन महाराष्ट्र व कर्नाटक मधुन वाहत जाऊन कृष्णा नदीला जाऊन मिळते. कुंडली हि भीमाची उपनदी आहे. पंढरपुर हे महाराष्ट्रातील प्रसिध्द आणि महत्त्वाचे तिर्थक्षेत्र ह्या नदीच्या किनाज्यावर वसलेले आहे. पंढरपुरमध्ये ह्या नदीच्या प्रवाहाला चंद्रभागा हे नाव आहे.
कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. लांबी सु. 867 किमी. जलवाहनक्षेत्र सु. 70,613 चौ. किमी 'भीमरथा' 'भीमरथी' ही तिची इतर नावे असून सोलापूर जिल्हयात पंढरपूर येथे तिचे पात्र चंद्रकोरीप्रमाणे दिसते त्यामुळे तेथे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. स्थूलमानाने आग्नेयवाहिनी असलेली ही नदी पूणे, अहमदनगर, सोलापूर या महाराष्ट्र राज्याच्या जिल्हयांतून व विजापूर, गुलबर्गा या कर्नाटक राज्याच्या जिल्हयांतून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते.
भीमा नदी सहयाद्रीच्या रांगेत समुद्रसपाटीपासून 975 मी. उंचीवर भीमाशंकरजवळ उगम पावते. उगमानंतर पुणे जिल्हयातून पुणे, अहमदनगर व पुणे-सोलापूर जिल्हयांच्या सरहद्दींवरुन व पुढे सोलापूर जिल्हयातून वाहत कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्हयाच्या सरहद्दीपर्यंत येते . नंतर विजापूर व गुलबर्गा जिल्हयांच्या सरहद्दीवरुन गुलबर्गा जिल्हयातून ती वाहत आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांच्या सीमेवर रायचूरच्या उत्तरेस 25 किमी वर कुरुगी येथे कृष्णा नदीस मिळते. उगमानंतर प्रारंभीचे सु. 60 किमी. अंतर नदीचा प्रवाह अरुंद व खोल अशा दरीतून वाहतो, परंतु पुढे मात्र तिचे पात्र रुंद होत गेलेले आहे. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, घोड, नीरा, माण, सीना इ. तिच्या प्रमुख उपनद्या होत.
गोदावरी नदीच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीचे खोरे आहे. परंतु कृष्णा नदीची उपनदी भीमा हिने महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापलेला आहे. तसेच भीमा नदी कृष्णेला महाराष्ट्राच्या सरहद्दीबाहेर मिळत असल्याने भीमा नदीचा स्वतंत्रपणे विचार केला जातो.
नदीप्रणालीचे क्षेत्र :-
भीमा नदीचा उगम पुण्याजवळ भीमाशंकर येथे आहे. खंडाळयाच्या उत्तरेस 40 कि.मी. अंतरावर भीमा नदीचे उगमस्थान आहे. बालाघाट डोंगराच्या उत्तरेस गोदावरी नदी वाहते तर दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे. नंतर भीमा नदी आग्नेयेस 451 कि. मी. अंतर वाहत जाते आणि कर्नाटकात रायूचरजवळ कुरुगुड्‌डी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम होतो. महाराष्ट्रात भीमा नदीप्रमाणालीचे क्षेत्रफळ 64.184चौ. कि. मी. आहे.
राजकीय क्षेत्र :-
भीमा खोज्यात पुणे व सोलापूर जिल्हयांचा संपूर्णपणे समावेश होतो तर सातारा जिल्हयाचे खंडाळा, फलटण व दहिवडी तालुके, नगर जिल्हयाचे दक्षिणेकडील श्‌्ा्रीगोंदा, कर्जत व जामखेड तालुके, मराठवाडयातील बीड जिल्हयातील आष्टी तालुका आणि उस्मानाबाद जिल्हयातील परांडा, भूम, तुळजापूर व उमरगा हे तालुके समाविष्ट होतात.
उपनद्या :-
भीमा नदीस उजव्या किनाज्याने म्हणजे दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा-मुळा, नीरा व माण या नद्या मिळतात तर डाव्या किनाज्याने म्हणजे उत्तरेकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.
भीमा नदीचा प्रवाहमार्ग :-
भीमा नदीचा उगम सुमारे 1,000 मी. पेक्षा जास्त उंचीच्या डोंगरावर भीमाशंकर येथे होतो व पहिल्या 8 कि. मी. च्या अंतरामध्येच नदी एकदम खाली कोसळते आणि 200 मी. उंचीच्या प्रदेशावरुन वाहू लागते. सुरुवातीस सुमारे 50 ते 55 कि.मी. वाहते. त्यांनतर मार्गामध्ये भामा आणि इंद्रायणी नद्या उजव्या किनाज्याने आणि वेळ नदी येऊन मिळाल्यावर नद्या येऊन मिळतात. नंतर भीमा नदी आग्नेयेस वळते व नागमोडी वळणाने 20-22 कि. मी. गेल्यावर भीमा व घोडनदीचा संगम होतो. घोडनदीला डाव्या किनाज्यापासून कुकडी व मीना नद्या मिळतात. पुढे टेंभुर्णीजवळ उजव्या किनाज्याने भोर तालुक्यातून वाहत येणारी नीरा नदी येऊन मिळते. या आधी नीरा व कज्हा नद्यांचा संगम होतो. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरातून भीमा नदी वाहत जाते व त्यानंतर उजव्या किनाज्याने येणारी माण नदी भीमेला मिळते.
सीना खोरे :-
भीमेच्या डाव्या किनाज्याने सीना नदी वाहते. अहमदनगर जिल्हयात सीनेचा उगम होतो. तिला भोगावती व बोरी या उपनद्या येऊन मिळतात. नंतर सीना नदी ही भीमेला सोलापूर जिल्हयात मिळते.
भीमा नदीस मिळणाज्या प्रमुख उपनद्या
(1) वेळ नदी :-
सहयाद्रीचा एक सुळका धाकले येथे या नदीचा उगम होतो. ही नदी आग्नेयेस वाहताना भीमा नदीस समांतर वाहते आणि तळेगाव -ढमढेरेच्या खाली 8 कि. मी. अंतरावर भीमा नदीस मिळते. या नदीची लांबी 64 कि. मी. आहे.
(2) घोडनदी :-
घोडनदीच्या उगमाचे स्थान नदीच्या उगमाच्या उत्तरेस 15 कि.मी. अंतरावर आहे. सुमारे 24 कि.मी. च्या अंतरामध्ये प्रदेशाची 200 मी. उंची कमी होते. तिला मीना व कुकडी या उपनद्या येऊन मिळतात व शिरुरजवळ भीमा नदीस घोडनदी येऊन मिळते.
(3) भामा नदी :-
भीमाशंकराच्या दक्षिणेस 10 कि.मी. अंतरावर भामा नदीचा उगम होतो. तिच्या खोज्यास 'भामनेर' असेही म्हणतात पिंपळगावजवळ ती भीमा नदीस येऊन मिळते.
(4) इंद्रायणी नदी :-
लोणावळयाच्या नैऋत्येस 5 कि. मी. अंतरावर कुरवंडे खेडयाजवळ नदीचा उगम होतो. नंतर ती पूर्वेस वाहते. डाव्या किनाज्याने तिला आंध्र नदी मिळते. देहू आणि आळंदी या पवित्र तीर्थक्षेत्री इंद्रायणी वाहत जाते. नंतर भीमा आणि इंद्रायणीचा संगम होतो.
(5) मुळा -मुठा :-
बोरघाटाच्या दक्षिणेस मुळा नदीचा उगम होतो. त्यानंतर ती पौड गावाजवळून वाहते, नंतर ती पूर्वेस वळते. मार्गात पवना आणि पुढे पुण्याजवळ उजव्या किनाज्याने मुठा नदीस येऊन मिळते. मुळा -मुठेचा संयुक्त प्रवाह रांजणगावाजवळ भीमा नदीस मिळतो. मुठा नदीचा उगमही सहयाद्रीतील डोंगरामध्ये होतो. प्रवाहाचा पहिला भाग भोर तालुक्यात आहे. नंतर ती पुणे जिल्हयात प्रवेश करते. पुढे मुठा नदी पुणे शहरातून वाहते व मुळा नदीस मिळते.
(6) नीरा :-
भोर तालुक्यात नीरा नदीचा उगम होतो. नंतर ती ईशान्येस वाहते व काही अंतर पुणे आणि साताज्याची सरहद्द निर्माण करते. नंतर नीरा व कज्हा नद्यांचा संगम होतो व शेवटी भीमा नदीस मिळते.
भीमा खोज्यात पुणे, अहमदनगर, बारामती, फलटण, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद आदी शहरे वसली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा