प्रवरा नदी

                                                                  प्रवरा नदी



       महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्हयातून सामान्यत: पश्चिम-पूर्व दिशेने वाहणारी गोदावरीची उपनदी. लांबी 200 किमी. ही अहमदनगर जिल्हयाच्या अकोला तालुक्यात, सहयाद्रीच्या पूर्व उतारावर कुलांग रतनगड या शिखरांदरम्यान उगम पावते. उगमापाशी अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे. उगमानंतर ती पूर्वेकडे अकोला, संगमनेर या तालुक्यातून जाऊन पूढे श््ा्रीरामपूर राहूरी या तालुक्यात पिचडगावाजवळ प्रवरेस मुळा ही तिची महत्वाची उपनदी मिळाल्यानंतर ती ईशान्यवाहिनी बनते आणि प्रवरासंगम येथे गोदावरीस मिळते. या नदीस डावीकडून आढळा, महाळुंंगी उजवीकडून मारस्ंागि गोरा यांचा संयुक्त प्रवाह तसेच मूळा या महत्वाच्या उपनद्या मिळतात. प्रवरा नदीवर अकोला तालुक्यात भंडारदरा येथे 1926 मध्ये विल्सन धरण बांधण्यात आले. त्यातील पाणी नदीच्या पात्रात सोडून ओझर येथील बंधाज्याने अडवून तेथून दोन कालव्यांद्वारा संगमनेर, राहूरी, श््ा्रीरामपूर, नेवासे या तालुक्यातील 23,750 हे. शेतीस पुरविले जाते. ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पानुसार या नदीवर अकोला तालुक्यात निळवंडे येथे धरण बांधले जाणार असून त्याद्वारे अकोला, संगमनेर, राहूरी, कोपरगाव, श््ा्रीरामपूर नासिक जिल्हयातील सिन्नर . तालुक्यांतील 65,590 हे जमिनीस पाणीपुरवठा केला जाईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा