महाराष्ट्रातील मृदा

महाराष्ट्रातील मृदा 

महाराष्ट्रातील मृदा सर्वत्र सारखी नाही. हवामानात विशिषेत: पर्जन्यमानात असणाऱ्या फरकामुळे वनस्पतीमध्ये व त्यामुळे मृदा प्रकारातही फरक आढळून येतो. महाराष्ट्रात मुख्यत: दोन प्रकारची माती सापडते. 1000 मि.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात बहुतकरून काळी माती सापडते. सह्याद्रीच्या पूर्वेला असलेल्या पठाराचा बहुतेक सर्व भाग या मातीने व्यापलेला आहे. या मातीला 'रेगूर' असेही म्हणतात. ही जमीन सुपीक असल्याने तिला कापसाची काळी माती असेही नाव आहे. ही माती प्रामुख्याने सपाट पृष्ठभागावर व नद्याच्या काठी आढळते.

याउलट जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी माती सापडते. यात प्रामुख्याने जांभा मातीचा समावेश होतो. या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनीयमचे प्रमाण जास्त असते. ही माती आम्लधर्मीय असल्यामुळे शेतीला उपयुक्त नाही. याप्रकारची माती कोकणात तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही आढळते. याशिवाय विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील तांबूस रंगाची हलकी रेताड माती, किनारपटट्ीवर काही प्रमाणात मिळणारी विशेषत: नद्यांच्या मुखाशी सापडणारी खारी माती हे मृदांचे अन्य काही प्रकार आहेत.


अ.क्र. मृदा प्रकार                       प्रदेश                                     गुणधर्म                                           पिके
1 काळी मृदा रेगूर मृदा     सह्याद्रीचा घाटमाथा, गोदावरी,     ओलावा टिकवून ठेवणारी           कापूस, गहू, 
                                     कृष्णा तापी नदी खोरे. सुपीक मृदाकडक उन्हामुळे भेगा पडतात.  ऊस, ज्वारी,                                                                                                                                                   जवस इ. 

2 जांभा मृदा      रत्नागिरी, स्ंाधिुदुर्ग, रायगड,    जांभा खडकात बॉक्साईटचे मोठे साठे.      हापूस आंबा,
                                 कोल्हापूर इ.                         ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता .        काजू, चिक्कू 

3 किनाऱ्याची गाळाची   उत्तर दक्षिणेस किनारीपट्‌टात            क्षारयुक्त मृदा.                 तांदूळ प्रमुख पीक
 मृदा (भाबर मृदा)           च्ंांचिोळया भागात.  ,                                                    नारळ, पोफळीच्या बागा.


4 तांबडी आणि    सह्याद्रीचा भाग, विदर्भाचा पूर्व भाग,      रासायनिक पदार्थांचे प्रमाण            भरड धान्ये,  
 पिवळसर मृदा      वर्धा व वैनगंगा खोरे .                      मृदा पातळ थराची, कमी सुपीकता,        बाजरी  .                                                                                                     वाळुमिश्रीत.                           प्रामुख्याने






काळी मृदा किंवा रेगूर मृदा
महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाची मृदा दख्खनच्या पठारावरील काळी मृदा आहे. तिने दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे.

प्रदेश :
सहयाद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओेलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळया मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र काळी मृदा आढळते. अर्थात रेगूर मृदेचे स्वरुप सर्वत्र सारखे असतेच असे नाही. मृदेच्या थराची जाडी बदलत असते. त्याप्रमाणे रंगही गडद काळया रंगाचा असून फिकट होत असतो.

महाराष्ट्रात सर्वात उत्तम प्रकारची कापसाची काळी मृदा ही गोदावरी, भीमा, कृष्णा तसेच तापी नदीच्या खोऱ्यात आढळते. त्याचप्रमाणे त्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यात देखील काळी मृदा आहे. तिला कापसाची मृदा असेही संबोधले जाते. जवळपासच्या उंचवटयाच्या प्रदेशातही अशा प्रकारची मृदा आढळते. परंतु त्या ठिकाणी मृदेचा थर कमी कमी होत जातो आणि तिचा रंग फिकट होत जातो. हळूहळू मृदेची सुपीकता कमी होते आणि जास्त उंचीवर तिचे रुपांतर तांबडया मृदेत होऊ लागते. काळया मृदेचे प्रामुख्याने दोन उपप्रकार पडतात. : (अ) मैदानावरील मध्यम काळी मृदा व दरीमधील खोल काळी मृदा.

निमिर्ती
दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून तयार झालेल्या खडकांमध्ये ॲल्यूमिनिअम आणि फेरोमॅगेनीजचे प्रमाण जास्त असते. अशा खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. वाषिर्क पाऊस 50 ते 75 सें. मी. दरम्यान असणाऱ्या आणि पर्जन्याचे 30 ते 50 दिवस असणाऱ्या प्रदेशात काळी मृदा तयार होते. काळी मृदा तयार होण्याचे प्रमुख कारण मृदेमध्ये हयूमसचे भरपूर प्रमाण होय असे सांगितले जात असे परंतु आता काहींच्या मतानुसार टिटॅनी फेरस मॅग्नेटाईटचे अल्प प्रमाण, तसेच लोहाचे भरपूर प्रमाण यामुळे मृदेस काळा रंग प्राप्त होतो. पठाराचा मूळ खडक बेसॉल्ट देखील निमिर्तीस कारणीभूत आहे.

रासायनिक पृथक्करण
काळया मृदेची सर्वसाधारण खोली 3 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते. त्यामध्ये चिकणमातीचे प्रमाण 55 पर्यंत आढळते. मॅग्नेशिअम कार्बेनिट, कॅल्शिअम कार्बेनेट यांचे प्रमाण भरपूर असते.तिच्यात ॲल्युमिनिअम ऑक्साइड देखील मोठया प्रमाणात असते तर फॉस्फरस, नायट्रोजन व सेंदि्रय द्रव्यांचे प्रमाण बरेच कमी असते.

गुणधर्म :
(1) काळया मृदेचे रंगानुसार विविध प्रकार पडतात. उदाहरणार्थ, गडद काळी मृदा, मध्यम काळी मृदा, उथळ काळी मृदा वगैरे. (2) नद्यांच्या खोऱ्यात मृदेची सुपीकता जास्त प्रमाणात असते, परंतु पठारी भागात मात्र सुपीकता कमी कमी होत जाते. पठारावरील मृदेचे वैशिष्टय म्हणजे तिच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते. (3) काळया मृदेचे वैशिष्टय म्हणजे तिच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते.

(4) मृदू कण आणि रासायनिक द्रव्यांमधील चुनखडीच्या प्रमाणामुळे सुपीकता कमी होत नाही.

(5) उन्हाळयात कोरडया हवेत काळी मृदा भुसभुशीत होते. तसेच मृदेच्या वरच्या थरास कडक उन्हामुळे मोठया भेगा पडतात. (6) अशा भेगांमध्ये मृदेचे सुटे कण जातात, तसेच हवा देखील राहते.

(7) मान्सूनच्या पाऊस सुरु झाल्यावर या मृदेवरील भेगा नाहीशा होतात व ही सुपीक मृदा पिकांस अत्यंत अनुकूल असते. (8) कापसाच्या काळया मृदेचा एक महत्वाचा दोष म्हणजे मृदेमध्ये वाजवीपेक्षा जास्त पाणी असल्यास किंवा अतिरिक्त जलस्ंाचिन झाल्यास जमिनीत पाणी साचून ती दलदलयुक्त होते.

महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम भागात कालव्याच्या साहाय्याने जलस्ंाचिनाची सोय असणाऱ्या पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर जिल्हयात मृदेमधील क्षार वरच्या थरात केशाकर्षण मुळे वर आलेले आहेत. एकदा का मृदेमध्ये असे क्षार वर जमा होऊ लागले की तिची सुपीकता झापाटयाने कमी होते व ती हळूहळू परंतु कायम स्वरुपात नापीक बनू लागते. अशी ही क्षारयुक्त मृदा पुन्हा कोणत्याही उपायाने पिकाखाली आणता येत नाही, याचा वाईट अनुभव वर उल्लेखिलेल्या प्रदेशात काही ठिकाणी आला आहे. अशा जमिनीला ाोपण असेही म्हणतात. उत्तर महाराष्ट्रात पूर्णा नदीच्या खोऱ्यात देखील भूमिगत पाण्याची उथळ पातळी आणि पाण्याचा निकृष्ट प्रतीचा निचरा यामुळे अशा तऱ्हेची चोपण जमीन तयार झालेली आहे.

जांभा मृदा
प्रदेश
महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागात कोकणातील रत्नागिरी, स्ंाधिुदुर्ग व रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हयात आणि सहयाद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा मृदा आढळते. गडचिरोलीच्या पूर्व भागात जांभा मृदा आहे.

निमिर्ती :
उष्ण कटिबंधीय प्रदेशात आर्द्र हवामानात जांभा मृदा तयार होते. पावसाचे प्रमाण महाराष्ट्रातील वरील प्रदेशात 200 सें. मी. पेक्षा जास्त असल्याने तेथील खडकांचे विदारण आणि झीज होते. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होतो. बरीचशी सेंदि्रय द्रव्ये मृदेच्या खालच्या थरात जातात व काही द्रव्ये भूमिगत पाण्यातून वाहतात किंवा केशाकर्षणामुळे वरच्या थरातून कल्शिअम, बेरिअम आणि सोडिअमची संयुगे खालच्या थरात जमा होतात. जमिनीमध्ये लोह, ॲल्युमिनिअम आणि मॅगेनीजची संयुगे असतात. खडकामध्ये सिलिकांवर विदारणाची क्रिया होऊन लिच्ंागिची प्रक्रिया व त्यापासून आयर्न ऑक्साइड तयार होतो. अशा तांबूस पिवळसर मृदेस जांभा मृदा म्हटले जाते.

रासायनिक पृथक्करण
जांभा मृदेमध्ये वर उल्लेखिल्याप्रमाणे प्रामुख्याने लोह आणि ॲल्युमिनिअमच्या ऑक्साइडचे प्रमाण भरपूर असते. त्यामानाने चुनखडीचे प्रमाण कमी असते. साधारणपणे पोटॅश, नायट्रोजन व सेंदि्रय पदार्थाचे प्रमाण कमी असते.

गुणधर्म :
उंच डोंगराळ प्रदेशात तसेच सखल प्रदेशातही जांभा मृदा आढळते.

(1) जांभा खडकामध्ये बॉक्साइडचे साठे विपुल प्रमाणात पाहावयास मिळतात. सहयाद्री पर्वताच्या 1000 मी. उंचीच्या प्रदेशात आढळणाऱ्या जमिनीमधील मूळ खडकाचा वरचा थर वहनाने निघून गेलेला आहे. कारण तेथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. जांभा मृदेचा थर तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांबडया छटांचा असतो.

(2) उंचावरच्या प्रदेशातील जांभा मृदा अतिशय पातळ, उथळ आणि खडकाळ स्वरुपाची असते. तिच्यात ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असत नाही.

(3) रत्नागिरी व स्ंाधिुदुर्गच्या सखल भागामध्ये जांभा मृदेचे संचयन झालेले आहे. अशा सखल प्रदेशातील जांभा मृदेचा रंग गडद असतो. मृदेमध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते.

पीके
जांभा मृदा जरी साधारण सुपीक असली तरी तिची सुपीकता दख्खनच्या पठारावरील काळया मृदेपेक्षा कमी असते. या मृदेपासून कोकणामध्ये रत्नागिरी व स्ंाधिुदुर्ग जिल्हयात प्रामुख्याने फळबागांची लागवड मोठया प्रमाणात केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी प्रावीण्य संपादन केलेले आहे. रत्नागिरीमधील हापूस आंबा महाराष्ट्रातच नव्हे तर जगात प्रसिध्द आहे. त्यांची निर्यात करुन परकीय चलन मिळते. याशिवाय काजू, चिक्कू वगैरे फळझाडांचे उत्पादन मिळते.

किनाऱ्याची गाळाची मृदा
प्रदेश
महाराष्ट्रात कोकण किनारपऱ्या लगत सखल प्रदेशात गाळाची मृदा आहे. तिला ााबर मृदा असेही म्हणतात. ही मृदा कोकणात उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्‌टीलगत असून अतिशय च्ंांचिोळया प्रदेशात आढळते.

निमिर्ती
कोकणामधून वाहणाऱ्या नद्या आपल्या प्रवाहाबरोबर आणलेला गाळ या प्रदेशात पसरतात. तसेच खाजण आणि खाडयांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची मृदा तयार होते

पिके
ही मृदा वाळूमिश्‌्ा्रति लोम प्रकारची असते. या मृदेत प्रामुख्याने तांदळाचे पीक घेतनले जाते, तसेच किनाऱ्यालगतच्या प्रदेशात नारळ व पोफळीच्या बागा आढळतात.

तांबडी आणि पिवळसर मृदा
प्रदेश :
महाराष्ट्रामध्ये तांबडी व पिवळसर मृदा मर्यादित प्रदेशात पसरलेली आहे. सहयाद्रीच्या पर्वतमय भागात विशेषत:उत्तर कोकणलगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा तयार झालेली आहे.

निमिर्ती
महाराष्ट्रातील अतिशय जुन्या अशा व्ंाध्यियन आणि कडाप्पा, तसेच आकिर्यनकालीन ग्रॅनाइट आणि नीस खडकांवर विदारणाची झिज होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे. ती चिकणमाती आणि वाळूमिश्‌्ा्रति असून तिला आयर्न पेरॉक्साइडमुळे तांबडा रंग आलेला आहे. बहुतेक मृदा लोम प्रकारची असते.

रासायनिक पृथक्करण :
तांबडया मृदेमध्ये वर उल्लेखिल्याप्रमाणे प्रामुख्याने आयर्न पेरॉक्साइड असते. चुनखडी आणि कार्बेनिटचे प्रमाण अल्प असते. तसेच फॉस्फरिक ॲसिड, हयूमस आणि पोटॅश यांचेही प्रमाण अल्प असते.

(1) तांबडया मृदेची रचना, रंग, खोली, रासायनिक पदार्थाचे प्रमाण, सुपीकता यांच्यात स्थिरता असत नाही.

(2) पूर्णपणे तांबूस व लाल तांबडी मृदा असत नाही. तिचा रंग तपकिरी, पिवळा किंवा राखी देखील असू शकतो.


(3) उंचावरच्या प्रदेशात थरांची व रासायनिक पदार्थानी युक्त गडद रंगाची सुपीक ाोम प्रकारची असते.

३ टिप्पण्या: