कृष्णा नदी

                    कृष्णा नदी

दक्षिण भारतातील गोदावरी आणि कावेरी यांदरम्यानची प्रमुख नदी. लांबी सु. 1,280 किमी., जलवाहन क्षेत्र सु. 2,52,400 चौ. किमी. कृष्णेचा उगम सहयाद्रीच्या रांगेतील धोम महाबळेश्वराच्या 1,438 मी. उंचीच्या डोंगरात 17 डिग्री 59' . 73 डिग्री 38' पू. येथे सु. 1,220 मी. उंचीवर होतो. येथून पश्चिमेस अरबी समुद्र फक्त सु. 65 किमी. दूर आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री सावित्री या नद्यांचे उगम झरे दाखवितात. या नद्या महाबळेश्वराहून वेगवेगळया दिशांनी वाहत जातात. त्यांना मूळ पाणी पुरवठा फक्त मोसमी पावसापासूनच होतो. महाबळेश्वर येथे दरवर्षी सु. 625 सेंमी. हून अधिक पाऊस पडतो, त्याच्या पूर्वेस सु. 20 किमी. पाचगणी येथे सु 225 सेंमी., तर 32 किमी. वरील वाई येथे फक्त 60 ते 75 सेंमी. पडतो. महाबळेश्वर डोंगराच्या उत्तरेकडून खाली येऊन कृष्णा आग्नेय वपूर्व दिशंनी वाहून लागते. सु. 10 किमी. वरील धोम येथे धरण बांधले जात आहे. वाई खोज्याला समृध्द करीत कृष्णा वाईच्या आग्नेयीस 37 किमीवर असलेल्या माहुलीस येते. येथे कृष्णेला वेण्णा नदी मिळते येथून कृष्णा दक्षिणवाहिनी होते. माहुलीपासून 50 किमी. कराड कृष्णा आणि कोयना यांचा प्रीतिसंगम आहे महाबळेश्वरहून पश्चिमेस उतरून मग दक्षिणेकडे वाहणाज्या कोयनेवर कोयनानगर येथे प्रचंड धरण बांधून त्याचे पाणी बोगद्यातून पश्चिमेकडे नेऊन खाली डोंगरातूनच पोफळी येथील बीजघरात नेले आहे. कराडपासून वर कृष्णेवर खोडशी येथे बंधारा आहे. त्याच्या जोडीला कोयनेचेही पाणी शेतीला उपलब्ध होईल. सांगलीजवळ कृष्णेला पश्चिमेकडून वारणा पूर्वेकडून येरळा हया नद्या मिळतात. कुरूंदवाड येथे कोल्हापूराकडून आलेली पंचगंगा नदी कृष्णेला मिळते तेथेच नदीच्या दुसज्या काठावर श््ा्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्ताचे जागृत देवस्थान आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा