नर्मदा नदी
नर्मदा नदी ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. मध्यप्रदेशातील अमरकंटक टेकडयावर उगम होऊन पश्चिमेला वाहते. विंध्य पर्वत व सातपुडा पर्वताच्या मधुन नर्मदा नदी वाहत जाते. नर्मदा नदीची एकुण लांबी 1289 कि.मी. (801 मैल) आहे. हि नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात ह्या तीन राज्यातुन वाहते व नंतर अरबी समुद्राला जाऊन मिळते. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधले जात आहे त्यामुळे गुजरात राज्यातील सौराष्ट्र व कच्छ प्रदेशांना शेतीसाठी पाणी पोहववले जाणार आहे. नर्मदा नदीमुळे भारताचे उत्तर भारत आणि दक्षिण भारत हे दोन भाग परंपरेने केले जातात. नर्मदा नदीच्या किनाज्यावर ओकांरेश्वर व महेश्वर हे दोन हिंदुचे महत्त्वाचे तिर्थक्षेत्रे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा