घोडनदी



                                        घोडनदी


पुणे जिल्हयांच्या उत्तर भागातून वाहणारी भीमेची आग्नेयवाहिनी उपनदी. आंबेगाव तालुक्यातील आहूपे गावाजवळ हिचा उगम असून दौंडच्या वायव्येस पाच कि.मी. सांगवीनजिक ती भीमेस मिळते. या नदीची एकूण लांबी अंदाजे 145 कि.मी. असून मीना आणि कूकडी या तिच्या प्रमूख उपनदया आहेत. आंबेगाव, घाडेगाव, वडगाव आणि शिरूर हि तिच्या काठांवरील मूख्य गावे. घोडखोज्याचा मध्य व पूर्व भाग कमी पावसाच्या दुष्काळी भागात मोडतो; त्यांमूळे शिरूर तालुक्यात या नदीवर मातीचे धरण बांधून शेतीस पाणी नुकतेच उपलब्ध करून दिलेले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा