भोगावती नदी
ही नदी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा नदीचा एक शीर्षप्रवाह होय. लांबी सु. 82 किमी. सर्वसामान्यपणे दक्षिणोत्तर वाहणारी ही नदी सहयाद्रीच्या रांगेत, कोल्हापूर शहराच्या नैऋत्येस सु. 48 किमी वर फोंडाघाटाच्या दक्षिणेस उगम पावते सु. 40 किमी वाहत गेल्यावर बीड गावाजवळ तिला डाव्या बाजूने तुळशी नदी मिळते. तदनंतर त्याच्या संयुक्त प्रवाहास बहिरेश्वर येथे कंुभी व धामणी या नद्यांचा संयुक्त प्रवाह येऊन मिळतो, हा एकत्रित प्रवाह पुढे प्रयागजवळ कासारी नदीस मिळतो. व येथून पुढे हा प्रवाह पंचगंगा नदी या नावाने ओळखला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा