कृष्णा नदीचे खोरे

              कृष्णा नदीचे खोरे

महाराष्ट्र पठारावरुन वाहणाज्या गोदावरी नदीच्या खालोखाल महत्वाची कृष्णा ही नदी आहे. दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यत वाहते.
नदीप्रणालीचे क्षेत्र :-
कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला 1220 मी. उंचीवर 17 अंश 59' . . 73 अंश 38' पू.रे. येथे झालेला आहे. 'क्षेत्र महाबळेश्वर ' येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री सावित्री या पाच नद्यांची उगम - क्षेत्रे पाहावयास मिळतात. कृष्णा नदीचा उगमाच्या ठिकाणापासून पश्चिमेस 65 कि. मी. अंतरावर अरबी समुद्र आहे. कृष्णा नदीचा उतार सुरुवातीस दक्षिणेस आहे. नंतर नदीचा प्रवाह पूर्वेस आग्नेयेस होतो. महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेशातून कृष्णा नदी वाहत जाते शेवटी त्रिभूज प्रदेश निर्माण होऊन मछलीपणजवळ बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. कृष्णा नदीची एकूण लांबी 1280 कि.मी. असून नदीप्रणालीचे क्षेत्र 2,59,000 चौ. कि. मी. आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा प्रवाह फक्त 282 कि.मी. लांबीचा असून तिचे नदीप्रणालीचे क्षेत्र 28,700 चौ. कि. मी. आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीचे खोरे भीमा उपनदीचे खोरे मिळून वाषिर्क पाण्याचा प्रवाह 27,920 दशलक्ष घनमीटर आहे.
राजकीय क्षेत्र :-
कृष्णा नदीच्या खोज्यात सातारा खोज्याचे खंडाळा, फलटण माण तालुके, सांगली संपूर्ण कोल्हापुर जिल्हयाचा समावेश होतो.
पश्चिमेस सहयाद्री पर्वत पूर्वेस शंभू महादेव डोंगरांच्या रांगा यांच्या दरम्यान कृष्णा नदी वाहते. तसेच सर्वसाधारणपणे नदीप्रवाहाची दिशा उत्तर दक्षिण असून ती सहयाद्री पर्वतास बज्याच अंशी महाराष्ट्रात समांतर आहे. महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोज्यास अप्पर कृष्णा खोरे असे म्हटले जाते. कृष्णा नदीच्या उगमाच्या क्षेत्रात महाबळेश्वरच्या परिसरात पावसाचे प्रमाण 500 ते 625 सें. मी. च्या दरम्यान आहे. कृष्णा नदीला बहुतेक सर्व नद्या उजव्या किनाज्याने किंवा पश्चिम दक्षिणेकडून मिळतात. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा वेदगंगा या नद्या उजव्या किनाज्याने तर येरळा नदी डाव्या किनाज्याने कृष्णेस मिळते.
कृष्णा नदीचा प्रवाहमार्ग :-
कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाल्यावर ती आग्नेयेस वाहू लागते. त्यानंतर कृष्णा नदी वाई क्षेत्रात पावन करुन सातारा जिल्हयात माहुली येथे येते. येथे कृष्णा वेण्णा नद्यांचा संगम होतो. नंतर कृष्णा नदी दक्षिणवाहिनी होते. पूर्वेकडील सुळक्यांना वळसा घालून माहुलीपासून सुमारे 50 कि. मी. अंतरावर कज्हाड येथे कृष्णा कोयनेचा प्रीतिसंगम होतो. सातारा जिल्हयात या नद्यांव्यतिरिक्त कुडळी, उरमोडी तारळी या नद्या वाहतात. पूर्व पुढे आग्नेय दिशेने वारणा नदी 130 कि. मी. वाहत जाते सांगलीजवळ उजव्या किनाज्याने कृष्णेस मिळते. सांगली काल्हापूर जिल्हयातून वाहणारी पंचगंगा नदी कुरुंदवाडजवळ कृष्णा नदीस मिळते. तेथून जवळच श््ा्रीक्षेत्र नृस्ंाहिवाडी येथे दत्ताचे जागृत देवस्थान आहे. कोल्हापूर जिल्हयात दक्षिण भागातून वाहणाज्या दूधगंगा वेदगंगा या नद्या ईशान्येकडे वाहत जाऊन त्यांचा संगम होतो कुरुंदवाडच्या पुढे 15 कि. मी. अंतरावर कृष्णा नदीस हा संयुक्त प्रवाह येऊन मिळतो. डाव्या किनाज्याने कृष्णा नदीस फक्त येरळा नदी वाहते. नदीचा उगम सातारा जिल्हयात खटाव तालुक्यात शंभू महादेव डोंगरात होतो. भिलवडीजवळ कृष्णा नदीस येरळा मिळते.कोल्हापूर जिल्हयातून दक्षिण भागातून दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा ताम्रपर्णी नद्या वाहतात. कृष्णा नदीच्या खोज्यात महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, तसेच किलोर्स्करवाडी, इस्लामपूर सारखी शहरे आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा