महाराष्ट्रातील वने
महाराष्ट्रात हवामानातील फरकानुसार वनस्पतीमध्येही
विविधता आढळते.जंगलांचेप्रमाणही सर्वत्र सारखे नाही. दाट जंगले मुख्यत: सह्याद्री वपूर्वविदर्भातील
चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात. सह्याद्री पठारी भागाकडेपावसाचे प्रमाणकमी होते व जंगलेही
विरळ होतात. महाराष्ट्राच्याएकूण क्षेत्रफळांपैकी 21 जमीनजंगलांनी व्यापली आहे, असा
सरकारीअंदाज आहे.
महाराष्ट्रातील वनश्रींचे आढळणारे
विविध प्रकार आणि विविधता यांचे अस्तित्वस्थानिक परिसरात असलेली भौगोलिक परिस्थिती,
पर्जन्यमान, जमिनीचा मगदूर,चढउतार, समुद्रसपाटीपासून उंची यांवर अवलंबून असलेले दिसतात.
वनश्रीच्याजडणघडणीमध्ये वरील नैसगिर्क कारणांप्रमाणे काही अनैसर्ग्ाकि कारणांचाही
म्हणजेबोयदा जंगलतोड, अनिर्बंध गुराढोरांची चराई, वणवे इ. मोठा भाग असतो. याकारणांमुळे
विद्यमान वनश्रींच्या प्रकारात पूर्णपणे आविष्कार झालेली वने फारचक्वचित ठिकाणी,
अतिदुर्गम ठिकाणी अथवा देवरायांतून आढळतात. शास्त्रीय दृष्टयामहाराष्ट्रातील वनश्रींचे
ढोबळमानाने खालील प्रकार सांगता येतील .(1) सदाहरीतवने, (2) निमसदापर्णी वने, (3) आर्द्र
पानझडी वृक्षवने, (4) शुष्क पानझडी वृक्षवने,(5) खाजण वने, (6) नदीकाठची वने, (7) रुक्ष
प्रदेशातील काटेरी खुरटा झाडोरा आणि (8)लागवडीखालील वनशेती.
उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये :
250 ते 300 सें.मी. पेक्षा जास्त
पावसाच्या प्रदेशात ही अरण्ये प्रामुख्याने आढळतात.सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, पश्चिम
उतारावर आणि विशेषत: दक्षिण कोकणात अशाप्रकारची जंगले आढळतात. रानआंबा जांभूळ हेमोठे
वृक्ष, रानकेळी, कारवी, नेचेइत्यादी झुडपे आणि वेत यांचीहीबरीच गर्दी या जंगलांमध्ये
आढळते. या जंगलातीललाकूड कठीणअसल्याने आथिर्कदृष्टया तितकेसे महत्त्व नाही.
उष्ण कटिबंधीय अर्धसदाहरित अरण्ये
:
150 ते 200 सें.मी. पाउस असलेल्या
प्रदेशात या प्रकारची जंगले आढळतात. उष्णकटिबंधीयसदाहरित अरण्ये व पानझडी वृक्षांची
अरण्ये यांमधील जोडभागात ही अरण्येआहेत. ही तुटक स्वरूपात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर
पायथ्याकडील भागात वखंडाळयासारख्या ठिकाणी घाटमाथ्याकडील भागात आढळतात.या प्रकारच्या
अरण्यात सदाहरितव पानझडी या दोन्ही प्रकारचे वृक्षआढळतात. किंडाळ, शेवरी, आइन, हेदू,
कदंब व काहीप्रमाणावर बांबू याजंगलामध्ये प्रामुख्याने आहेत. यातील काही जातीआथिर्कदृष्टयामहत्त्वाच्या
आहेत.
पानझडी वृक्षांची अरण्य :
पश्चिम घाटाच्या पूर्वेस 100 ते
150 सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही जंगलेआढळतात. कोरडया हवेच्या काळात बाष्पाचे प्रमाण
टिकविण्यासाठी या प्रकारची झाडेआपली पाने गाळतात. या प्रकारच्या अरण्यांचे पावसाच्या
प्रमाणानुसार आर्द्रपानझडीअरण्ये व शुष्क व पानझडी अरण्ये असे दोन प्रकार पडतात. गोंदिया,
चंद्रपूर व भंडाराजिल्हे, सह्याद्री पूर्व उतार, महादेव,हरिश्चंद्र व सातमाळरांगा,
धुळे जिल्ह्यातीलसातपुडा पर्वतभाग आणि ठाणे जिल्ह्याचा डोंगराळ प्रदेश या भागात ही
जंगले आहेत.साग, आईन, हिरडा, कुसुम, शेवरी, आवळा, शिरीष, पळस, खैर, शिसव, अंजनइत्यादीजातीचे
वृक्ष या जंगलांमध्ये दिसतात. आथिर्कदृष्टया या जंगलांनाफार महत्त्वआहे.
उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटया वनस्पतीची
अरण्ये :
पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा
कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळआहेत. या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा
प्रकारच्या वनस्पती उगण्याचे कारणआाहे. नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या
पूर्व भागात सोलापूर, मराठवाडाव पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी
खुज्या वनस्पती वत्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते. बाभूळ, बोर,
खैर, निंब हेवृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या
भागातमात्रपानझडी जातीचे वृक्ष आढळतात.
मॅग्रॅुव्ह प्रकारची अरण्ये :
किनारपटट्ीलगत समुद्रकाठच्या दलदलीच्या
प्रदेशात व खाऱ्याजमिनीत 'मॅंग्रुव्ह'(खारफुटी) प्रकारची जंगले आढळतात. यामध्येचिपी,
मारांडी झुडपे व तिस वृक्ष इत्यादीफक्त खाऱ्या जमिनीतवाढणाऱ्या जातीच आढळतात.
जंगलाखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी
80 पेक्षा अक्षिक जास्त प्रदेश वनखात्याच्याताब्यात आहे. यातील जवळजवळ 65 ते 70 जंगलेराखीव
व सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातीलजंगले चंद्रपूर, भंडारा,गोंदिया, अमरावती, यवतमाळ,
धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे,दक्षिणरत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात केंद्रीत झाली आहेत.
विदर्भा तसर्वात कमीम्हणजे 4.5 जमीन जंगलाखाली आहे.
सदाहरित वने :-
महाराष्ट्रात हा प्रकार फारच तुरळक
आढळतो. साधारणत: 1,200 ते 1,400 मी.उंचीवरील विपुल पर्जन्यमानाच्या प्रदेशात जेथे स्थानिक
भू-भागाला संरक्षण आहे अशादुर्गम पठारी अथवा दऱ्याखोऱ्यातून सदाकाळ हिरवीगार असलेली
वने आढळतात. या भागातपर्जन्यमान 360 ते 600 सेंमी. असते, या प्रकारची वने महाबळेश्वर,
खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी
असली तरीदऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरितवृक्ष
मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे,
झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरेआढळतात. विकसित झालेल्या
उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी, पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.
निमसदापर्णी वने :-
सदाहरीत वनांच्या खालच्या बाजूस
जेथे पर्जन्यमान 200 ते 360 सेंमी. आहे आणिउष्णतामान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा
प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेशयेथे साधारणत: हिरवीगार राहणारी अरण्ये असतात.
या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडीअसतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये
सदाहरित वृक्षांचा भरणा अधिकअसतो. उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर,
हिन्हई, जांबत वगैरे तरमध्यम झाडोरा आढळतो. सदाहरित वनांप्रमाणेच आर्थ्ाकि दृष्टया
हया वनांपासून फारसेउत्पन्न मिळत नाही. परंतु सहयाद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप
थांबविण्याच्यादृष्टीने या वनांचे महत्व फार आहे.
आर्द्र पानझडी वने :-
घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर
सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, काही वेळा सपाटीवर सुध्दा या प्रकारची
वने आढळतात. पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान
वृक्ष असलेली पानझडी वृक्षांचीजंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची
उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्व फार आहे. वनव्यवस्थापनाच्यादृष्टीने
अशा ंकिंमती वनांची खास देखभाल केली जाते. उंच वृक्षांमध्ये सागवान वत्याच्याबरोबरच
शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष अर्जुनसादडा,धावडाइ. उपयुक्त वृक्ष
सापडतात. सागवानरीइमारती लाकडाचे इतर जातीच्या इमारतीमालांपेक्षा कित्येक पटीनी जास्त
उत्पन्न असल्याने वनव्यवस्थापनामध्ये त्याच्याकडेजास्त लक्ष पुरविले जाते, अशा वनात
नेहमी पाणी असणाऱ्या ओढयांच्या काठीसाधारणत: बाबूंची बेटे आढळतात.
शुष्क पानझडी वृक्षवने :-
या प्रकारच्य वनराजीत पानझडी वृक्षांचे
प्रमाण सर्वात जास्त असते.उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे
दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात. पण त्याची प्रत एवढी चांगली नसते,
असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, कोश्ंाबि, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण,टेंबुणीर
वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम
आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीनेया प्रकारच्या वनांना
कमी महत्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारीजंगले म्हणून ही राने उपयुक्त
मानली जातात. अशा तऱ्हेच्या रानातील वृक्षांची वाढअतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड
सुरु झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यासवेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या
वनस्पती म्हणजे तेंदू, गवते,औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्व वाढविता येईल.
खाडीकाठची खाजण वने :-
कोकण प्रदेशातील काही खाडयांच्या
आसपास पाणथळ अथवा गाळ असलेल्याभूभागात खाजण किंवा खारपुरीची जंगले आढळतात. भारतीच्या
वेळी जमीन खाऱ्यापाण्याखाली असते अशा रानातील वृक्षांची उंची 4 ते 6 मी. असते. पाणथळ
जमिनीमुळेवृक्षांच्याआसपास जमिनीतून बाहेर आलेली श्वसन मुळे दिसतात. अशा वनराजीपासूनजळाऊ
लाकूड चांगले मिळते. या भागात वाढणाऱ्या वनस्पतींपासून टॅनीन मिळतअसल्याने कातडी कमावणे,
मासेमारीची जाळी धुणे यांकरिता त्यांचा उपयोग केलाजातो.
नदीकाठची वने :-
बारमाही पाणी असणाऱ्या नद्यांच्या
अथवा ओढयांच्या काठी अरुंद उंच सखल भागातहया प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात. गाळाची
माती व पाण्याची विपुलता यांमुळेया वनांची वाढ चांगली होते. काही वेळा अशा ठिकाणी असणाऱ्या
देवरायांमधून 30-40मी. उंचीचे वृक्ष आढळतात. अशा रानातील झाडोऱ्यात नेहमी हिरवेगार
असणारे वृक्षअसतात. उदा. करंज, आंबा, जांभूळ, उंबर, पाडळ, पुत्रजीवी वगैरे, इतर झाडोऱ्यात
अटक,करवंद, दिंडा, गिरनूळ, वगैरे झुडपे सापडतात. काही ठिकाणी काटस बाबूंची बेटे वाबाभळीची
वने चांगली पोसतात. अशा रानातून आणि विशेषत: देवरायांतून स्वच्छपाण्याचे झरे आढळतात.
रुक्ष खुरटी वने :-
अतिशय कमी पर्जन्यमानाच्या, नेहमी
पाण्याचे अवर्षण असलेल्या प्रदेशातखुरटया, काटेरी वनस्पती आढळतात, चराऊ प्राण्यापासून
बचाव करण्यासाठी, तसेचपाण्याचे दुर्भ्ाक्षि टाळण्यासाठी अशा वनस्पती खुज्या आणि तीक्ष्ण
काटे असलेल्या आढळतात.तरी पण मानव इंधनाकरिता अशी झुडपेदेखील काढून नेतो व त्यामुळे
अधिक वैराणअसलेला प्रदेश उजाड होतो. वाळवंटी हवामानास उपयुक्त अशा वनस्पतींची अशा ठिकाणीपध्दतशीर
लागवड करुन या प्रदेशाचा विकास साधता येईल.
वनशेती :-
समुद्र किनाऱ्यावरील रेतीमध्ये
काही ठिकाणी गेली कित्येक वर्षे वन विभागातर्फेखडशेरणीची लागवड केली जाते. यापैकी काही
लागवडीची सुरुवात 1889-90 साली झालीअसून ही लागवड व्यापारी दृष्टया किफायतशिर समजली
गेली आहे. आपण जसेनियमितपणे पीक काढतो त्याप्रमाणे 15-20 वर्षाच्या आवर्तनानंतर वृक्ष
तोड करुनपुनर्लागवड आयोजन कार्य वनविभागातर्फे होत असते. हल्ली सामाजिक वनीकरणप्रकल्पाखाली
ठिकठिकाणी जनतेच्या सहकार्याने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व संरक्षणया गोष्टीचे महत्व
पटत चालले आहे. युकॅलिप्टस, सुबाभूळ, विलायती बाभूळ वगैरेजलद वाढणाऱ्या व इंधनाच्या
दृष्टीने किफायतशीर असणाऱ्या वृक्ष जातींची लागवड सुरुआहे. व त्याला मर्यादीत प्रमाणात
यश येऊ लागले आहे.
जंगलांचे फायदे :
जंगलांचे अनेक फायदे आहेत. जमीन
धुपण्यापासून वाचवणे, पुरावरनियंत्रण,हवामानात समतोल आणणे, प्राणी व वनस्पतींची जपणूक
करणे हे प्रमुख फायदेहोतात. शिवाय इमारत, जळण, फनिर्चरसाठी, घरेशाकारणीसाठी लाकूड,
निरनिराळयाप्रकारची तेले, खैर, डिंक, काथ्या, मध, लाख इत्यादी अनेक गोष्टी जंगलापासूनमिळतात.
महाराष्ट्रात लाकूडतोडीचा व्यवसाय कंत्राटदारी पध्दतीने चालतो. आईन, खैर,शिसव, साग,
बाभूळ इत्यादी जातीचे लाकूड कठीण असल्यामुळे त्याचा उपयोगइमारतीच्यालाकडासाठी फनिर्चर
व शेतीची अवजारे तयार करण्यासाठी केलाजातो. बाभूळ, चिंच,खैर, हिरडा याचे लाकूड जळण्यासाठी
वापरले जाते.
जंगलाचा दुसरा प्रमुख उपयोग कागद
निमिर्तीसाठी होतो. उदा.चंद्रपूर जिल्ह्यातबल्लारपूर (कागजनगर) येथील कागद गिरणीलालगद्यासाठी
लागणाऱ्या कच्च्या मालाचापुरवठा आजूबाजूच्या जंगलातून केला जातो. आपटयाची व टेंभुर्णीची
पाने विडयावळण्याकरिता उपयोगातआणली जातात. महाबळेश्वर परिसरात मधुमक्षिकापालन व्यवसायचालतो.
शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पती, डिंक व मध महाराष्ट्रात सर्वत्र गोळाकेला जातो. कोकण
प्रदेशात कारवीचा उपयोग घराच्या भिंती बांधण्यासाठी व नारळव ताडाच्या झावळयांचा उपयोग
घरे शाकारण्यासाठी केला जातो.
लाकूड कापणीच्या 50 पेक्षा जास्त
गिरण्या महाराष्ट्रात आहेत. त्यांच्याजास्त भरणामुंबई व नागपूर या ठिकाणी आढळतो. होडया
तयारकरण्याचा उद्योग किनारी प्रदेशातचालतो. सावंतवाडी व पेण येथेलाकडी खेळणी तयार करण्याचा
उद्योग आहे.
सद्यस्थिती
राष्ट्रीय धोरणानुसार व शास्त्रीय
दृष्टिकोनातूनही एकूण क्षेत्रफळापैकी निदान 33क्षेत्र जंगलाखाली असावे असे मानले जाते.
परंतु महाराष्ट्रात हे प्रमाण फक्त 21इतकेच आढळते. सर्व भारताची सरासरी 23 आहे. उपग्रहाव्दारेघेतलेल्या
छायाचित्रांनुसारराज्यातील फक्त 9 क्षेत्र प्रत्यक्ष वनाखालीआहे. गेल्या काही दशकात
वाढत्यालोकसंख्येच्या दबावामुळे फार मोठयाप्रमाणावर जंगले तोडली गेली. कंत्राटदारांनीकेलेल्या
चोरटया जंगलतोडीचे प्रमाणही मोठे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळेजास्तीतजास्त जमीन शेतीखाली
आणली गेली. तसेच जाळण्यासाठी, रस्त्यांसाठीमोठयाप्रमाणावर झाडे तोडली गेली. शहराच्या
भरमसाठ वाढीत त्यालगतची जंगले नष्ट झाली.धरणयोजना पार पाडतांना वनक्षेत्रावर आक्रमण
होते. याशिवाय बेदरकारपणे गुरेचारल्यानेही जंगलांचे अतोनात नुकसान झाले.
जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र वाढविण्यासाठी
सर्व पातळयांवर प्रयत्न व्हायला हवेत.किनारपटट्ीलगत पुळण मातीत केलेली खडशेरणीची लागवड
किंवा देशावर पडीक वकमी प्रतीच्या जमिनीवर केलेली युकॅलिप्टस्व सुबाभूळ यांची लागवड
करण्यासाठीस्वयंसेवी संस्थांचेही साह्य मोठया प्रमाणावर घेतले जात आहे. वनमहोत्सवाकरीतालागणारी
रोपे व त्यांचे वाटप करण्यासाठी राज्यातील वनविभागाने राज्यभररोपवाटिका निर्माण केल्या
आहेत. तेथे रोपांची निवड, लागवड, निगायासंबंधीमाहिती मिळते. राज्यात अशा सुमारे
330 रोपवाटिका आहेत. सन 1974 मध्ये महाराष्ट्रवनविकास मंडळाची स्थापना झाली.
वनांच्या विकासात उपाययोजना :
1) उद्योगाभिमुख वनविकास. या मध्ये
वन उत्पादनावर आधारित उद्योगांचाविकासअभिप्रेत आहे.
2) प्रतिबंधक वनविकास. यात पूर
नियंत्रण, मृदासंधारण असे कार्यक्रम येतात.
3) वन्यप्राणी व परिसर संरक्षण
4)सामाजिक वनीकरण : यात पर्यावरणाच्या
गरजांच्या दृष्टीनेवनविकास अभिप्रेतआहे. आठव्या योजनेत वनीकरणावर रू. 405 को. वसामाजिक
वनीकरणावर रू. 102 को.खर्च अभिप्रेत आहे.
5) महाराष्ट्रवनीकरण प्रकल्पास
जागतिक बॅंकेने मंजुरी दिली आहे. 1992-98याकालावधीत हा प्रकल्प राबवला गेला व त्याचा
एकूण खर्च रू. 431 कोटीहोता.त्यापैकी 87 जागतिक बॅंकेकडून येणार आहे.
विकासाच्या एकूण गरजा लक्षात घेता
पर्यावरणातील 'वनस्पती' याघटकावर यापुढेनेहमीच ताण पडणार आहे. त्यामुळे वनांचाप्रकषिर्क
वापर करून त्यातून उत्पादन आणिउत्पन्न वाढत्या प्रमाणावरअपेक्षित असेल तरी यावर केव्हा
तरी मर्यादा पडणारच. तेव्हाकालांतरानेनष्टप्राय होणाऱ्या महत्त्वाच्या उत्पादन घटकांना
कृत्रिम पर्याय शोधणेअटळराहील. कागद गिरणीमध्ये बांबूऐवजी कृत्रिम धाग्याचा लगदा व
उसाच्याचिपाटाच्याचोयटया किंवा तांदूळ निराळा केल्यानंतर उरणाऱ्या साळीयांचा व्यापारी
तत्त्वावर वापरझाल्यास वनस्पतींवरील ताण हलका होईल.त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे
शहरी व ग्रामीणजनतेची जळाऊ लाकडाचीगरज ही गोबर गॅस, नैसगिर्क वायू आणि सौरशक्तीचीउपकरणे
अशांसारख्या मार्गांनी काही प्रमाणात भागविली गेली तरच परिस्थितीकाबूतराहिल.
सरकारतर्फे वन महोत्सव, वन्यजीवन
सप्ताह, वनदिन, पर्यावरणदिन साजरे केलेजातात. त्यांना प्रदर्शने, व्याख्याने, फिल्म
शो, स्लाईडशो, परिसंवाद, दौरे, टि.व्ही.कार्यक्रम, स्टिकरतर्फे प्रचार यांची जोडदिली
जाते.
उत्तम माहिती दिली आहे आपण 👌
उत्तर द्याहटवा