गोदावरी नदी

                   गोदावरी
      गोदावरीनदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. गोदावरी नदीची लांबी 1,450 किलोमीटर (900 मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमुंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. भीमा, वैनगंगा, . उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमुंद्रीपासून 10 किमी अंतरावर समुद्रापासून 80 किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.
गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणाज्या पाण्यापैकी 80 पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी 200 मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी 6.5 कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.
ऐतिहासिक , धामिर्क , आख्यायिका
प्रवरेकाठी दैमाबाद येथे झालेल्या उत्खननांनंतर इतिहासकाराच्या मते पाषाण युगापासून मानवी वस्ती गोदावरी खोज्यात असावी हडप्पा संस्कृतीला समकालीन अशा संस्कृतीचा उगम या खोज्यात झाला असावा.
रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात गोदावरी तटावर आश््ा्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात ते ठिकाण नेमके कोणते याचा काही पुरावा उपलब्ध नाही नदी काठची अनेक गावे सारखाच वारसा सांगतात.
एका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून,शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा आहे आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी पडलेल्या 24 वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते. त्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी गंगाद्वार ही पवित्र स्थाने आहेत. अहिल्या, गंगा, वैतरणा या उपनद्या ब्रह्मगिरीवर उगम पावतात त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीस मिळतात. ऐतिहासिक काळात पैठण राजमुंद्री येथे विविध राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ पाहिला. नजीकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात गोदावरी खोज्यात मुख्यत्वे मोगल निजामाची राजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात निजामाने स्वतंत्र भारतात संलग्न होता आपले वेगळे राष्ट्र निमिर्ण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु कॉॅंग्रेस आर्य समाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तीसंग्राम नेटाने चालवला. भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांद्वारे केलेल्या पोलीस कारवाईनंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला.
महत्त्वपूर्ण शहरे, मानवी वस्ती, संस्कृती
गोदावरी खोज्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. निजाम काळात उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात असे. भात हे तेलुगू लोकांचे मुख्य अन्न आहे तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न आहे. रेल्वे हा या संपूर्ण भागाला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे.
गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिलिर्ंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक औद्योगिक शहर आहे. कोपरगाव तालुक्याचे शहर, जायकवाडी सिंचन प्रकल्प अशियातील सर्वात मोठा मातीचा बंधारा आहे. पैठण हे धामिर्क महत्त्वाचे स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्शवभूमीवर नयन रम्य उद्यान आहे. नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते.
आंध्रप्रदेशात कंदाकुर्थी येथे मंजीरा नदी, हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय स्कंद आश््ा्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बासर येथे देवी सरस्वतीचे मंदिर असून, धर्मापुरी (करीमनगर जिल्हा) हे सुद्धा प्रसिद्ध धामिर्क स्थळ आहे. पट्टीसिमा ह्या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट डोंगरावर श््ा्री वीरभद्र मंदिर आहे. भद्राचलम येथेही श््ा्रीरामाचे सुंदर मंदिर आहे.राजमुंद्री हे गाव राजमहेंद्री या नावानेदेखील ओळखले जात असे. राजा महेंद्रवर्मन हा इतिहासातला पहिला तेलुगू राजा येथे होऊन गेला. डौलैस्वरम येथे 100 वर्षे जुना आशियातील सर्वात लांब लोहमार्ग पुल आहे. कोव्वुर, तानुकु, श््ा्रीरामा सागर प्रकल्प ,पोचमपाड इत्यादी गोदावरी नदीवरील महत्त्वपूर्ण स्थळे आहेत.
आंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी पुष्कर मेळा गोदावरी तीरावर भरतो, कुंभमेळयाप्रमाणेच याचे स्नानमाहात्म्य सांगितले जाते.
भौगोलिक
सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात 1,067 मीटर उंचीवर सुरू होणाज्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरून साधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलमनंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून(पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी 200 मीटर पेक्षा कमी तर खोली 60 फूट आत एवढीही असते. गोदावरी खोरे 3,12,812 वर्ग कि.मी. क्षेत्र व्यापते. यातील महाराष्ट्रात 1,52,199 वर्ग कि.मी., आंध्र प्रदेश 73,201 वर्ग कि.मी., छत्तीसगड 65,255 वर्ग कि.मी., ओरिसा 17,752 वर्ग कि.मी., कर्नाटकात 4,405 वर्ग कि.मी. आहेत.
गोदावरीचा त्रिभुज प्रदेश 5,100 वर्ग कि.मी.चा असून अत्यंत सुपीक समजला जातो. या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे 3 मुख्य टप्पे असून शेवटच्या 2 टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.
इतर नद्यांशी तुलना
एकूण लांबीत गोदावरीचा जगात 92वा क्रमांक आहे. 6,690 कि.मी. लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी 3,180 कि.मी. लांबीसह 21व्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुत्रा 2,948 कि.मी.(28वा क्रमांक), तर 2,510 कि.मी. वाहून गंगा 39वा क्रमांकावर येते. यमुना 1,376 कि.मी., सतलज 1,370 कि.मी. लांबीच्या आहेत अनुक्रमे 102 103 क्रमांकांवर आहेत. कृष्णा 1,300 कि.मी. वाहून 114व्या तर 1,289 कि.मी. वाहून नर्मदा 116व्या क्रमांक वर येते. 1,000 कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे 160 नद्या आहेत.
अंटाक्टिर्का आणि गोदावरी
130 दशलक्ष वर्षांपूर्वी गोदावरी अंटाक्टिर्का खंडातून वाहिली असेल का याचा भारतीय संशोधक शोध घेत आहेत. विभाजनपूर्व काळात दख्खनचे पठार आणि अंटाक्टिर्का एकाच गोंडवन खंडाचा भाग राहिले असावेत असा शास्त्र विश्वास आहे.
ऊर्धव गोदावरी
दारणा प्रकल्प, कोळगंगा - वाघाड प्रकल्प, उणंद - ओझरखेड प्रकल्प, कडवा - करंजवन प्रकल्प, प्रवरा - भंडारदरा जिल्हा अहमदनगर, महाळूंगी - महाळूंगी प्रकल्प, आडुळा - आडुळा प्रकल्प, मुळा - मुळा प्रकल्प, शिवणी - अंबाडी प्रकल्प.
मध्य गोदावरी
कर्पुरा, दुधना, यळगंगा, ढोरा, कुंडलिका, सिंदफणा, तेरणा, मनार, तीरु, सुकना, माणेरु, मंजीरा, किन्नेरासानी, पुर्णा, मन्याड, आसना, सीता नदी, लेंडी, वाण, बिंदुसरा.
विर्द आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे
मध्यप्रदेशतून येणारी वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास 360 मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते, वर्धा मध्य प्रदेशमध्ये मुल्ताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती(इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते.
खेक्रनाला-खेक्रनाला प्रकल्प, पेंच - पेंच प्रकल्प, बाग - बावनथडी (सागरा)प्रकल्प या विदर्भातून येणाज्या इतर उपनद्या आहेत
कर्नाटकातून येणारी
कर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र 1701 वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र 11900 वर्ग मैल आहे.1
ओरिसातून येणाज्या
                सिलेरु
                शबरी नदी
आंध्र प्रदेशातील
                तालिपेरू
निसर्ग, शेती आथिर्क
नांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहित, करकोचा, सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात.
नैसगिर्कदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापूस केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात मुख्यत्वे भाताची शेती केली जाते. मुख्यत्वे गोडया पाण्यातील छय्प्रन्दििाए प्रजातीतील मासे गोदावरी नदीत आढळून येतात. गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात व्हिसेनिआ प्रजातीचे मॅंग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात. मॅंग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसगिर्करित्या संरक्षण करतात.
बंधारे, पूल, नौकानयन
डौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन मासेमारी यामुळे संपन्न झाले.
जलव्यवस्थापन
गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणाज्या पाण्यापैकी 80 पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरित काळात खोज्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोज्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निमिर्ती केली गेली आहे. नदी खोज्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी औद्योगिक वापरांकरिता लागणाज्या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते.
गोदावरीखोज्याचे पाणलोट क्षेत्र 3,19,810 कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.5 भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोज्यात 1,798 टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी 75 म्हणजे 1,318 टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम 1,097 टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे 1,201 टी.एम.सी., तापी खोरे 322 टी.एम.सी., नर्मदा खोरे 20 टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण 1,890 टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील. आंध्र प्रदेश राज्यास किमान 1,480 टी.एम.सी. पाणी गोदावरी खोज्यातून उपलब्ध होणार आहे.
गोदावरीवरील काही सिंचन प्रकल्प
नाशिक मराठवाडा मिळून 66 लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी 16 टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता 29 टक्के एवढी आहे.
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान 1,32,000 हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते परंतु प्रत्यक्षात 45,000 हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प, नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून 48,00,000 हेक्टर शेतजमिनींपैकी 8,00,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (..1907), भावली(प्रस्तावित), वाकी(प्रस्तावित), भाम(प्रस्तावित), मुकणे(प्रस्तावित), अलिसागर-निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श््ा्रीरामसागर प्रकल्प पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत.
ज्            उपनद्यांवरील बंधारे
जलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेर्शओरिसा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी, मंजीरा नदीवर निजामसागर, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा, पुर्णा, अप्पर पैनगंगा, लोअर दुधना, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प-कंधार, ऊर्धव पैनगंगा-पुसद इत्यादी.
नैसगिर्क आपत्ती
अतिवृष्टी, पुरांची नैसगिर्क संकटे आणि कोरडे दुष्काळ दोन्हीही गोदावरीच्या खोज्यात आढळून येतात. पुरांमुळे नदीतील सुपीक गाळाचा लाभही परिसरातील प्रदेशाला होतो. वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा पूर धोकापातळी कमी झाली असली तरी नदीपात्रातील वृक्षतोडीनंतर नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्रालगतच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आथिर्क हानी मनुष्यहानी वाढल्याचे दिसून येत आहे.
प्रदूषण
गोदावरी नदीत नजीकच्या मोठ्या नागरवस्तीतून येणाज्या सांडपाण्यापासून सर्वाधिक 85 प्रदूषण होते. मान्सून सोडून इतर काळातील सिंचनोत्तर काळात नदीचे प्रवाह आधीच रोडावलेले कमी वेगाचे असतांना नदीची नैसगिर्क शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. शिवाय सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी वरचे वर घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते त्यामुळे पाणीनियोजन बिघडते खर्चही वाढतो. उरलेले 15 प्रदूषण औद्योगिक कारणांमुळे होते.


1 टिप्पणी: