सोमवार, २३ फेब्रुवारी, २०१५

गाडगे महाराज

                                           गाडगे महाराज (फेब्रुवारी २३१८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञानअंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणीधर्मशाळाअनाथालयेआश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.


"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश " 

  1. भुकेलेल्यांना = अन्न
  2. तहानलेल्यांना = पाणी
  3. उघड्यानागड्यांना = वस्त्र
  4. गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
  5. बेघरांना = आसरा
  6. अंध,पंगु,रोग् यांना = औषधोपचार
  7. बेकारांना = रोजगार
  8. पशु,पक्षी,मुक्या प्राण्यांना = अभय
  9. गरीब तरुण-तरुणींचे =लग्न
  10. दु:खी व निराशांना = हिंमत
  11. गोरगरिबांना=शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा